¡Sorpréndeme!

Ganesh Visarjan | दगडूशेठच्या दर्शनाला अजित पवारांच्या खिशात नव्हते पैसे, सुरक्षा रक्षकाने केली मदत

2022-09-09 72 Dailymotion

Ajit Pawar Ganesh Darshan in Pune : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. त्याआधी त्यांनी सपत्नीक दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत अभिषेक आणि आरती केली. मात्र यावेळी दगडूशेठ मंदिरात येताना अजित पवारांसोबत एक प्रसंग घडला. म्हणजे ते दर्शनासाठी मंदिरात जात होते पण अचानक थांबले. तेव्हा मागून एक सुरक्षा रक्षक धावत त्यांच्याकडे आला. दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली आणि त्यानंतर या सुरक्षा रक्षकाने त्याच्या खिशातील काही रक्कम अजित पवारांच्या हातात ठेवली ती स्वीकारत अजित पवार दगडुशेठच्या दर्शनासाठी पुढे निघून गेले.